प्रतिनिधी, जालना : अर्जुन खोतकर जालन्यात दर्शना बंगल्यावर दाखल कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून खोतकरांचं स्वागत.उद्या निर्णय जाहीर करणार
गेल्या चार दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याच्या चर्चे नंतर अर्जुन खोतकर हे आज थेट दिल्ली वरून जालना शहरात असलेल्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर जाण्यात दाखल होण्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली होती. यावेळी अर्जुन खोतकर आपल्या दर्शना बंगल्यासमोर येताच कार्यकर्त्यांकडून फटाके फोडूम जोरदार आतिषबाजी करत खोतकर यांच स्वागत केलं.अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्याच बरोबर कुटुंबातील सदस्य यांच्याशी चर्चा झाल्या नंतर अर्जुन खोतकर हे उद्या आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर दुसरीकडे जिल्ह्यातील खोतकर समर्थकाकाकडून एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनर वर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार, यांच्या बरोबर अर्जुन खोतकर यांचा फोटो लावत असल्याने खोतकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा निश्चित झाला असल्याचं ही बोलल्या जात आहे.
