जनतेज न्युज

शिक्षकाच्या सोयीसाठी केडीएमसी क्षेत्रात 5 टेस्टिंग सेंटर 5089 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्याची  करोना टेस्टिंग सुरु

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : राज्य शासनाकडून मागील 8 महिन्यापासून बंद असलेल्या माध्यमिक शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून 23 नोव्हेबर पासून शाळा सुरु होणार आहेत. मात्र तत्पूर्वी शाळेतील सर्व शिक्षकांना करोना टेस्टिंग करून घ्यावी लागणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळात जास्तीत जास्त शिक्षकाची टेस्टिंग करता यावी यासाठी आरोग्य विभागाकडून रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयाबरोबरच आणखी तीन ठिकाणी करोना टेस्टिंग सेंटर सुरु करण्यात आली असून डोंबिवलीत आणखी दोन सेंटर सुरु केली जाणार असल्याचे साथरोग प्रतिबंधक विभागाच्या डॉ प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
व्हीओ : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 253 माध्यमिक शाळा असून या शाळामध्ये 3562 शिक्षक तर 1527 शिक्षकेतर कर्मचारी असे एकून 5089 कर्मचार्याची सोमवार पूर्वी करोना टेस्टिंग करावी लागणार आहे. सोमवार 23 नोव्हेबर पासून माध्यमिक शाळा सुरु केल्या जाणार असून शाळासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीत राज्य शासनाने शिक्षकाची करोना टेस्टिंग करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थावर सोपविली आहे. या कर्मचार्याची टेस्टिंग करण्यासाठी पालिकेच्या दोन रूग्णालयासह साईनिर्वाण शहाड, वसंत व्हॅली कोव्हीड सेंटर तर डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेत टेस्टिंग सेंटर सुरु करण्यात आली असून उद्यापासून डोंबिवलीतील आणखी दोन शाळेत टेस्टिंग सेंटर सुरु केली जाणार असल्याचे पानपाटील यांनी सांगितले. दरम्यान ही चाचणी होत असताना आज सेंटर बाहेर एकच गर्दी झाल्याचे दिसून आले या ठिकाणी योग्य नियोजन करण्याची मागणी शिक्षकांकडून करन्यात येत आहे .याबाबत डॉ पानपाटील यांनी लॅब टेक्निशियनसह कर्मचाऱ्यांची कमतरता असून याबाबत तोडगा काढण्यात येईल असे सांगितले