प्रतिनिधी, नवी मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना जुनी प्रकरणे उकरून तडीपार केले जाते.भाषणावर आक्षेप घेऊन गुन्हे दाखल केले जातात.याच प्रकारे नवी मुंबईतील अनेकांवर असे प्रकार केल्याने शिवसेनेचा भव्य मोर्चा नवी मुंबई आयुक्तालयावर निघणार असल्याने बेलापूरच्या मैदानावर शिवसैनिक जमायला सुरुवात झाली असून तगडा पोलीस बंदोबस्त ही तयार करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता बाळगली आहे त्याच अनुषंगाने पोलिसांचा मोठा पाऊस फाटा आंदोलन स्थळी दाखल झाला होता शिवसैनिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई ठाणे रायगड या परिसरातून हजारोच्या संख्येने शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होते यावेळी पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
