प्रतिनिधी, औरंगाबाद- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गांधी भावनांमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबाद शहराच्या नामकरणाला विरोध असल्याचं सांगितले. नाव बदलुन शहराचा विकास होत नसतो..! आमचा विकासावर फोकसल्याच त्यांनी सांगितले. त्यांच्या विधानावर औरंगाबाद मनसे जिल्हा प्रमुख सुहास दशरथे यांनी निषेध व्यक्त केला आहे. याच बरोबर ‘शिवसेना सत्तेची लाचारी पत्करतो, की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंमत देतो’ हे येत्या काळात कळेलच असेही ते म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असुन, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही. असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
