प्रतिनिधी , महिन्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून भाजपचं सरकार सत्तेवर येणार आहे.या रावसाहेब दानवे यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर टिका केली आहे.ज्या भाजपला राज्यात भल्या पहाटे स्थापन केलेलं सरकार दोन दिवस टिकवता आलं नाही ते काय दोन महिन्यानंतर सरकार स्थापन करेल.भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे.त्यांना त्यांचे आमदार टिकून ठेवायचे आहे.त्यासाठी भाजपचे नेते उलट सुलट वक्तव्य करत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलाय.ते जालन्यात बोलत होते. काल रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असून भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केला होता.त्याला उत्तर देत विखे हे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गळाला लागले असून भाजप 2 महिन्यात फुटल्याशिवाय राहणार नाही असा दावा देखील खोतकर यांनी केलाय.
दानवेंना 2 महिने नाही 200 वर्ष भाजपचं सरकार येणार नाही असं म्हणायचं आहे,तुम्ही 2 महिने ऐकलं. त्यांनी 2 महिन्यांसाठी चकवा दिला आहे असं सांगत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे.पुढंचे 20 वर्ष राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार राहील तरीही भाजपचे प्रयोग सुरूच राहतील असं सांगत भाजपने त्यांचे 105 आमदार सांभाळून ठेवावे त्यांच्यावर मला शंका आहे असं सांगत सत्तार यांनी भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगितलं.
आज ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घर आणि ऑफिसवर ईडीने छापे टाकले असून याबाबत विचारलं असता केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत असून अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्या प्रमाणे केंद्र सरकारने राज धर्माचं पालन करावं. सरदेसाई यांच्याकडे एकेक रुपयांचा हिशोब असल्याचा दावा सत्तार यांनी केलाय.
कदाचित कोरोनाची दुसरी लाट आल्यास सरकारची सर्व यंत्रणा सज्ज असून लोकांनी सोशल डिस्टनसिंगचं पालन करावं. दुसरी लाट येऊ द्यायची की नाही हे लोकांच्या हातात आहे त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी असंही सत्तार यांनी म्हटलंय.
