जनतेज न्युज

शेगावात क्षयरोगावर पठनाटय करून जनजागृती..

पोलीस अधिकारी व
सदभवना महिला पथकाने केले सादरीकरण..

प्रतिनिधी , बुलडाणा (शेगाव): राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात टी.बी हरेगा देश जीतेगा. यावर आरोग्य विभागामार्फत पथनाट्यद्वारे जनजागृती करण्यात आली. लोकांना टी.बी बद्दल पुरेपूर माहिती, लक्षणे व त्यावरील उपाय पथनाट्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले व उपचार कुठे घ्यायचा, माहिती कुठून मिळवायची याची माहिती देण्यात आली.

आपल्या भारतामध्ये लोकशाही रोगाचं प्रमाण अधिक प्रमाण आहे आणि नुकताच कोविद १९ सुरु असल्याने  कुठेतरी आपल्या शहरातील क्षयरोगाचे पेशंट हे दबले गेलेले आहेत आणि ते तसेच घरी  पडलेले आहेत. यासाठी तालुका आरोग्य कार्यलयाकडून शेगावात सदभावना महिला कलापथकाच्या माध्यमाने शहरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करून टीव्ही चे लक्षण हा त्याचा उपचार याबाबत सादरीकरण करण्यात आले. सकाळी या पथकाची सुरुवात शेगाव शहर पोलीस स्टेशन च्या आवारात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये या रोगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.