जनतेज न्युज

शेजाऱ्यांन रस्ता अडवला, प्रशासनाचा उदासीनपणा, शेतकऱ्यांच 2 लाखांचं नुकसान

प्रतिनिधी , कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हतबल झाल्याचं अनेकदा पाहिलं पण केवळ आडमूठेपणामुळं काबाडकष्ट करून सुद्धा नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांना येते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील भुतमुगळी या गावातील शेतकरी गुणवंत रामतीर्थ व उशाबाई रामतीर्थ यांच्या शेताला असणारा शेत रस्ता अडवत त्यावर 14 शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने तळहातावर जपलेला ऊस आता वाळत जात आहे तर उसाला आलेली तोड वाटे अभावी परत निघून गेल्यामुळे किमान 2 लाख रुपयांचा नुकसान डोळ्यादेखत पाहण्याची वेळ आली आहे रामतीर्थ यांच्या शेता शेजारील 14 शेतकऱ्यांनी नकाशावर असलेला शिव व शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्याने आता वाट बंद झाली आहे यासाठी गुणवंत रामतीर्थ यांनी तहसील कार्यालय पोलीस ठाण्याच्या चकरा मारून चपला झिजवल्या पण यावर प्रशासनाची उदासीनता यामुळे रामतीर्थ यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही याऊलट त्याच्या मुलावर हल्ला केला गेला हतबल झालेले रामतीर्थ कुटुंबाना आता डोळ्यासमोर ऊस वळताना बघत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही जगण्याचं साधन असलेल्या शेतात अडीच एकर ऊस जोपासला पण धनदांडग्या शेजारच्या 14 शेतकऱ्यांन शासकीय शेत रस्त्यावर अतिक्रमण केले आहे आता सतत निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांला शासकीय अधिकारी दाद देऊन शेत रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल