जनतेज न्युज

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडी चे गेवराई तहसील कार्यालयासमोर धरणे

दिल्ली येथे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्याच्या व केंद्र शासनाच्या विरोधात शेतकरी आंदोलनास बसलेले आहे तसेच देशभरात ही शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ तसेच शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आत्याचार बंद करावा व तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने गेवराई तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे.या आंदोलनाला एम आय एम ने देखील पाठिंबा दिला असून एम आय एम देखील या आंदोलनात सहभागी झाली आहे.