प्रतिनिधी, जालना : जिल्हाधिकारी कार्यालया समोर पेटवून घेण्याचा प्रयत्न
पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप,शेतकरी दाम्पत्य ताब्यात.ट्रॅक्टर शोरूम चालकाला दिलेला धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तीस देऊन फसवणूक केल्याचा आरोप.
चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने उचकले पाऊल. जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या वेशात अगोदरच दबा धरून असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. संतोष पाटोळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, एका कंपनीच्या ट्रॅक्टरच्या शोरूम चालकाला दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तीला देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला असून, चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने या शेतकऱ्याने हा आत्महत्याचा प्रयत्न केला.दरम्यान शेतकऱ्या बरोबर त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
