जनतेज न्युज

शेतीच्या नुसकानासह घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी क्रांती संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा
प्रतिनिधी , विनोद सगणे : अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले असून कपाशीचे पीक सुद्धा बोंड आळीमुळे जात आहे पिकांचा शेतकऱ्यांना 100 टक्के पीक विमा मिळावा तसेच घरकुलांचा सर्वे करून त्वरित घरकुलाचा लाभ घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा अन्यथा शेतकरी क्रांती संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असे आदेश शेतकरी क्रांती संघटना अध्यक्ष गजानन बिलेवार यांनी सांगितले तसेच आशयाचे निवेदन तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले