जनतेज न्युज

शेवगाव तालुक्याला पावसाने झोडपले तातडीने पंचनामे करा – स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिनिधी , शेवगाव : शेवगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन मोठयाप्रमाणात अतिवृष्टी ढग फुटी होत आसल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. त्यामध्ये बाजरी, कापुस, मूग, सोयाबीन, ऊस, फळबागा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेवगाव तालुक्यात याबाबतचे कोणतेही पंचनामे चालू झाले नाही गेल्या काही दिवसांपासून होत. असलेल्या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी वारंवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन दिले आहे. तरी मागील दोन दिवसात शेवगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी पिका भुईसपाट झाली असून शासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकर्‍यांना हेक्टरी ५०हजार रूपयांची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदना द्ववारे केली आहे. तरी या बाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरतील याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील