जनतेज न्युज

संतोष बांगर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे जोड मारो आंदोलन

प्रतिनिधी, नांदेड वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्या नंतर आमदार संतोष बांगर यांच्या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.. नांदेडात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या फोटोला जोडे मारत फोटोचे दहन करण्यात आले. महात्मा फुले पुतळ्या समोर झालेल्या या आंदोलनाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्तीती लावली व संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले आहे