जनतेज न्युज

सकाळी कपाशी भरलेला ट्रकने अचानक पेट घेतला.

प्रतिनिधी , धुळे : चाळीसगाव रोडवरील गरताड गावाजवळ आज सकाळी कपाशी भरलेला ट्रकने अचानक पेट घेतला. या आगीत संपुर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. शेकडो क्विंटल कपाशी आणि ट्रक असे लाखो रुपयांचे नुकसान या घटनेत झाले. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच धुळे महापालिकेच्या अग्निशामक वेळीच धाव घेत आग विझवल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त . आज सकाळी धुळ्याहून औरंगाबादच्या दिशेने जाणारा एक कपाशीने भरलेला १२ चाकी मालट्रक अचानक टायर फुटल्या नंतर पेटला. आगीने काही क्षणातच उर्ग रुप धारण करुन संपुर्ण ट्रक त्यात जळू लागला. आग लागल्याचे लक्षात येताच चालक व क्लिनर यांनी आपला जीव वाचवत उड्या मारुन बाहेर पडले. आगीच्या मोठ्या ज्वाळा रस्त्यावर उठत असल्याने गरताड गावातील लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली . दरम्यान आगीची माहिती धुळे महापालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाचे प्रमुख ढाके यांनी पाण्याचा बंब घटनास्थळाकडे रवाना केला. बंब चालक राहुल पाटील, अतुल पाटील, पाटील, शाम कानडे, अमोल सरगर, सिध्दार्थ खैरनार या पाण्याचा मारा करुन आग विझवली. मनपा कर्मचाऱ्यांच्या यावेळी गावकऱ्यांनी कौतुक केले.