न्याय न मिळाल्यास दिल्यास दिला आत्मदहनाचा ईशारा.
प्रतिनिधी , जालना : विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या जालना जिल्ह्यातील पिंपळगाव पिंपळे गावच्या ३ सख्ख्या भावांच्या आई वडिलांना न्याय द्या या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपळगाव पिंपळे येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आई वडिलांना मदत जाहीर करा,अन्यथा आत्मदहन करू असा ईशारा आंदोलकांनी दिलाय.जोपर्यंत जाधव कुटुंबाला न्याय देणार नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही असा ईशारा आंदोलकांनी दिलाय
