प्रतिनिधी, वर्धा : वर्धा मांडवा मार्गावर असलेल्या झाडगाव,दिग्रस व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती सदर मार्गावरून गेलेल्या समृद्धी महामार्ग लगत आहे,या समृद्धी महामार्ग निर्माण होण्याआधी आमच्या शेतात ये जा करण्यासाठी वाहिवाटीचा एकच पांदण रस्ता होता व त्या पांदण रस्त्यावरून सदर शेतकरी आपल्या शेतात ये जा करीत होते व आपले शेती व शेतातील कामे करीत होते,परंतु जेव्हा पासून सदर समृद्धी महामार्ग निर्माण झाला व सदर महामार्गालगत सुरक्षा भिंत बांधण्यात आली त्यामुळे आमच्या शेतात जाणारा पांदण रस्ता हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे,त्यामुळे आम्हांला आमच्या शेती व शेतातील कामे करता येत नाही,आमचे व कामच्या कुटुंबाचे जीवन सदर शेतीवर अवलंबून आहे,समृद्धी महामार्ग व प्रशासनाने आमच्या शेतात ये,जा करण्यासाठीचा आमचा मार्ग मोकळा करून देण्यात यावा या आशयाचे निवेदन घेऊन आज दिणांक 6 जुलै रोजी झाडगाव दिग्रस व परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली व सदर मागणीचे दिले.
