प्रतिनिधी , सांगली : राज्यसभा निवडणुकीचा निकाल आमच्या डोळ्यासमोर असून, आता होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. सांगली मधील झुलेलाल चौक येथे सतेज पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलकाचे अनावरण करण्यात आले, त्या नंतर सतेज पाटील हे प्रसरामध्यमांशी बोलत होते.ज्या निवडणुका जनतेतून लढल्या जातात त्यामध्ये कोल्हापूरकरांचा काय कल असतो, हे सर्वांना माहीत आहे असं सांगून सतीश पाटील पुढे म्हणाले, महाडीक यांच्या वक्तव्याबाबत मी आता लगेच प्रतिक्रिया देणार नाही, मात्र निवडणुकांच्या रणांगणात उतरल्यावर आम्ही काय करतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.सरकारच्या विरोधात कोण बोलत असेल तर त्याच्या मागे ईडी लावा हे सुत्र झालं आहे.
