जनतेज न्युज

सरकार जनतेच्या प्रश्नांपासुन पळ काढत आहे – खा.सुनिल मेंढे

दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर खा.मेंढे यांची टिका

प्रतिनिधी , भंडारा : राज्यातील तिन तिघाडी सरकारला कुठलेही विशेष निर्णय घ्यायचे नाही आहे.मागील एका वर्षात सरकारने जे काही निर्णय घेतले ते पुर्णतःचुकीचे निर्णय घेतले.जनतेमध्ये सरकारविषयी मोठया प्रमाणात रोष आहे.कराराप्रमाणे हिवाळी अधिवेश हे नागपूरला होणे अपेक्षीत होते.मात्र कोरोनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने मुुंबई येथे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला जेव्हा की नागपूरपेक्षा मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या अधिक आहे.विज बिलाचा विषय असो कि शेतक-यांच्या धानावरील रोगराईचा विषय असतो सरकारला विदर्भातील जनतेशी काही देणे नाही.राज्य सरकारच्या दृष्टीने पुणे आणि मुंबई हेच पुर्ण महाराष्ट्र आहे.दोन दिवसाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडविणे शक्य नाही.जनतेच्या प्रश्नांपासुन पळवाट शोधण्यासाठी सरकारने दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे.सरकार जनतेला घाबरले आहे.