सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद हिंद सामाजिक संस्था वबिइंग ह्युमन गाईज पुणे शहराच्यावतीने पुणे अंध शाळेतील विद्यार्थ्यांसमवेतकेक कापून अन्नदानाचा कार्यक्रम
प्रतिनिधी : पुणे , पुणे बिइंग ह्युमन गाईजचे संस्थेचे संस्थापक बॉलिवूड अभिनेता व समाजसेवक सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद हिंद सामाजिक संस्था व बिइंग ह्युमन गाईज पुणे शहराच्यावतीने कोरेगाव पार्कमधील पुणे अंध शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत केक कापून अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
यावेळी बिइंग ह्युमन गाईज पुणे शहराध्यक्ष जावेद खान व असिफ खान यांच्याहस्ते अन्नदान करण्यात आले . तसेच पुणे स्टेशन परिसरातील गरीब गरजुंना थंडीसाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन बिइंग ह्युमन गाईज पुणे शहराध्यक्ष जावेद खान व आझाद हिंद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असिफ खान यांनी केले .
यावेळी यासिन शेख , सुजित यादव ,बिबिषण जाधव , जमसू शेख , राजेश गायकवाड , अविनाश मोरे , वसंत ननवरे , मल्लेश बरडी , केंडल मदरू , वसीम शेख , आशा झवेरी , गौरी ठाकूर , रुबिना खान , उषा गायकवाड , जया मोडकर , गौरव खुणे , लियाकत शेख , राजेश प्रजापती , सुनिल यादव , गोपी कसोटे , प्रशांत पाडळे आदी उपस्थित होते .
