जनतेज न्युज

ससूनमध्ये कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी , पुणे : ससून रुग्णालयातील मृतांमध्ये सोमवारी आणखी एका रुग्णाची भर पडली. कोंढवा येथील ५७ वर्षीय महिलेचा दुपारी कोरोनामुळे मृत्यू झाला. तिचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रात्री उशिरा तिला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. तर एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

सोमवारी मृत्यू झालेली महिला १९ एप्रिलला रुग्णालयात आली होती. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. कोरोना सदृश लक्षणे असल्याने तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पण त्याचा अहवाल येण्यापूर्वीच सोमवारी दुपारी मृत्यू झाला. रात्री उशिरा रुग्णालयाला मिळालेल्या अहवालामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ठ झाले. या महिलेला निमोनिया झाला होता. तसेच तिला मधुमेहही होता. सुदैवाची बाब म्हणजे कुटुंबातील इतर कोणालाही मृत महिलेमुळे संसर्ग झालेला नाही.

तर आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला २७ वर्षीय तरुण हा पुण्याच्या वडगाव शेरी येथील असून त्यांच्यावर पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील एकूण 63 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी 18 रुग्ण कोरोनामुक्त तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.