जनतेज न्युज

सहा लाख गरजूंना खाऊ घालणाऱ्या बिल्डरचा कोरोनामुळे मृत्यू

प्रतिनिधी , मुंबई : घाटकोपर येथील६५ वर्षीय बिल्डरचा सोमवारी रुग्णालयात शनिवारी कोविडमुळे मृत्यू झाला. लॉकडाऊनवेळी गरजूना जेवण वाटप करताना दिनेश शहाना संसर्ग झाल्याचा संशय पत्नी, मुलगा, सून आणि नातू यांनी व्यक्त केला आहे. लायन्स क्लबच्या वतीने स्वस्तिक बिल्डर्सचा मालक असलेल्या शाह यांनी सुमारे ६ लाख गरीबांना जेवण उपलब्ध करून दिले, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली.
शहाचा मुलगा हिरेन याने सांगितले की, त्यांच्यात जेव्हा लक्षणे दिसू लागली तेव्हा एक्स-रे आणि सीटी स्कॅन केले. त्यात त्यांना न्यूमोनिया झाल्याचे उघड झाले. त्यामुळे घरीच औषोधोपचार सुरु करण्यात आले. मात्र २५ जून रोजी त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि त्याला चेंबूरच्या एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाह यांना सोमय्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. तेथे ९ जुलै रोजी प्रकृती गंभीर झाली. त्याला टॉसिलीझुमॅबच्या तीन कुपी देण्यात आल्या, अशी माहिती हिरेन यांनी दिली.