प्रतिनिधी , सांगली : मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ सभापती व अधिकाऱ्यांनी विनापरवाना बेकायदेशीर व्यापारी गाळे हे विकण्यात आले तसेच 2017 पासून मार्केट कमीटीचे लेखापरीक्षण झालेले नाही ,,जर लेखापरीक्षण झाले तर यांचा खरा चेहरा समोर येईल ,,व मार्केट कमिटीच्या मागील बाजूस कोल्ड स्टोअरेज चे आरक्षण असताना या ठिकाणी व्यापारी गाळे बांधून ते परस्पर विकल्याने यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज सांगली शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब घेवारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून समिधितांवर करवाई करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत माहिती दिली
