प्रतिनिधी , सांगली : सांगली शहर भाजप च्या वतीने दोन दिवसापूर्वी लाईट बिल संदर्भात केलेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी स्टंटबाजी करत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना निशाणा करत कार्यकर्त्यांनी पायातील पैठण दाखवत निषेध केला होता व पालकमंत्री जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात करू देणार नाही असा इशारा दिला होता त्याचा निषेध म्हणून आज स्टेशन चौकातील गांधी पुतळा येथे अपशब्द वापरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात जोडे मारो आंदोलन केले यावेळी दलित महासंघ आणि पोलिसांच्या मध्ये झटापटीत पुतळा दहन करून दिला नाही व हा पुतळा ताब्यात घेण्यात आला यावेळी दलीत महासंघ आणि अन्याय निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते,,,
