जनतेज न्युज

सांगलीत बालचमू लागले किल्ला तयारीला: गणेशनगर येथील शिवस्मृती ग्रुपकडून साकारला जातोय सिंधुदुर्गचा जंजिरा किल्ला

प्रतिनिधी , सांगली: दिवाळीला अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. यामुळे सांगलीत आता बालचमू किल्ला उभारणीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे गल्लीबोळात किल्ले उभारणीचे वातावरण आणि बालचमूची पळापळ पाहायला मिळत आहे.
गणेशनगर येथील शिवस्मृती ग्रुपकडून सिंधुदुर्गचा जंजिरा किल्ला साकारला जातोय. यासाठी जंजिऱ्याचा नकाशानुसार
या ग्रुपच्या बालचमूकडून किल्ल्याची उभारणी केली जात आहे. यासाठी दगड, विटा तसेच माती याची जुळवाजुळव करत प्रत्यक्ष किल्ला उभारणीचे काम सुरू झालं आहे. यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असून जंजिरा किल्ला हुभे उभारणीसाठी बालचमुंची धडपड सुरू आहे. हुभेहुब जंजिरा साकारण्याचा या सांगलीच्या बालचमुंचा प्रयत्न सुरू असून दोन दिवसात हा किल्ला तयार होईल असे या बालचमुनी सांगितले.