प्रतिनिधी , सांगली : सांगली महानगरपालिकेकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत सांगलीत सायकल रॅली काढून वसुंधरा बचावाचा संदेश देण्यात आला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही सायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीत वसुंधरा बचावाच्या घोषणा देण्यात आल्या. महापालिका मुख्यालयापासून या रॅलीला सुरवात
झाली. या सायकल रॅलीत महापालिकेचे स्थायी सभापती पांडुरंग कोरे, माजी प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक अभिजित भोसले, सागर घोडके, सहायक आयुक्त पराग कोडगुले यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील सायकल पटू आणि पर्यावरण प्रेमीनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी सर्वांनीच वसुंधरा बचावाचा संदेश देत वसुंधरा रक्षणाची शपथ घेतली. महापालिकेचे क्रीडाधिकारी महेश पाटील यांनी या सायकल रॅलीचे नियोजन केले.
