प्रतिनिधी , सांगली : अंधश्रद्धा चा विळखा अजून किती घट्ट आहे… याचा प्रत्यय आज ही दिसून येत आहे.. नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.. त्यातच सांगलीच्या नागठाणे मध्ये भानामतीचे प्रकार समोर आला आहे… भर चौकात लाल कापड बांधून मडके टाकले गेले आहे.. आता हे कोणाच्या नावाने टाकले आणि का हा प्रश्नच आहे.. पण गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नागठाणे येथे ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त पडघम वाजत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे… गणेशनगर चौकात पडलेल्या एका मडक्याचे भलतीच खळबळ उडवून दिली आहे… स्वच्छ लाल कपड्यात एखादा अस्थीकलश वाटावा, असे मडके ठेवण्यात आले आहे…
काही महिन्यांपूर्वी नागठाणे येथील एका धार्मिक स्थळ परिसरात असाच एक अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला होता… त्यावेळी 40 देशी कोंबड्या, तितकेच लिंबू, खिळे, सुया, विशिष्ट रंगाचे कापड, भात असा उतारा टाकला होता… त्यानंतर लाल कापडाचे मडके चर्चेत आले… दर निवडणूकीला असे प्रकार होत असतेच… निवडणूक अटीतटीची असते… अशा प्रकारात राजकीय कार्यकर्तेच आघाडीवर असतात… सध्या लाल कपड्यातील मडक्याला दुरूनच पाहत ग्रामस्थ पुढे जात आहेत….
जगभरात परग्रहावर जायच्या चर्चा होत असल्या तरी खेड्यांत अजूनही असे प्रकार सुरु आहेत… त्याची दबक्या आवाजात चर्चा होते… निवडणुकांमुळे ती जाहीरपणे होत आहे इतकेच…
