जनतेज न्युज

सांगली जिल्ह्यातील मासळवाडीत दोन गटात मारामारी

सांगली जिल्ह्यातील मासळवाडीत दोन गटात मारामारी : मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून राडा : 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल : गुन्हे दाखल झालेल्या मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मनंद पडळकर यांचा समावेश

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यात मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला आहे. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात मारामारी झाली असून, यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हे दाखल झालेल्या मध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मनंद पडळकर यांचा समावेश आहे. दरम्यान ब्रह्मदेव पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. गावातील मंदिरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीजण चप्पल घालून आले होते. त्यावेळी मंदिरात चप्पल घालून का आला ? यावरुन वादा झाला होता, यातून गावातील 2 गटात हाणामारी झाली. या राड्यात त्याठिकाणी असणाऱ्या 2 दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.