प्रतिनिधी , सांगली :- गेल्या अडीच वर्षापासून सांगली महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे पण सांगली शहरातील रस्ते व नागरी सुविधा आजही प्रलंबित आहेत. तसेच येथील मोकळे भूखंड हडपण्याचा डाव सुरू आहे. त्यामुळे आज भाजपचे आजी माजी नेते व पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिरासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासन व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
