जनतेज न्युज

सागरेश्वर अभयरण्यात बिबट्याचे दर्शन

ट्रॅप कॅमेऱ्यात चित्रित : गव्यांचाही वावर ; परिसरात खळबळ
प्रतिनिधी , सागरेश्वर अभयारण्यातील ट्रॅप कॅमेयात बिबट्याचे दर्शन झाल्याने अरण्यात मोठी खळबळ उडाली आहे. अंतर्गत रस्ते आणि विश्रामधामच्या पाठीमागे
बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. यामुळे भीतीचे वातावरण आहे. याबाबत अभयारण्यात तातडीची बैठक घेऊन पर्यटन बंदीबाबत विचार करण्यात आला.
अभयारण्यात वेगवेगळ्या २५
ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी विश्रामगृहाच्या मागे असलेल्या कॅमेऱ्यात रात्री बिबट्या वावरताना दिसून आला. तसेच अभयारण्यात अनेक अंतर्गत रस्त्यांवर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. हा बिबट्या आसद हद्दीतील दाट झाडी असलेल्या अभयारण्याच्या भागातून आला असल्याचा वन अधिकारी यांचा दावा आहे.
(सागरेश्वर हे मानवनिर्मित अभयारण्य असून, त्याची निर्मिती 1985 साली झाली. प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि वृक्षमित्र स्वर्गीय धो. म. मोहिते यांच्या मोठा पुढाकाराने, उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.)