प्रतिनिधि , कोल्हापुर : २३ नोव्हेंबर पासून इयत्ता ९ ते १२ चा निर्णय घेताना पालकांची परवानगी, शिक्षकांची टेस्ट करणे, शाळाचे निर्जतूकीकरण करणे आदी उपयायोजना करण्यात आल्या, त्यानंतर सुरक्षीत वातावरणामध्ये शाळा सुरू झाल्या. त्याच प्रकारे दुसरया टप्यामध्ये ५ ते ८ विद्यार्थ्यांसाठी सुरक्षीत वातावरणामध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. इयत्ता नववीचे विद्यार्थी बारावीला जाणार आहेत, तर अकरावीचे विद्यार्थी बारावीला जाणार आहेत. मुलांच्या एका वर्षाचे नुकसान होउ नये साठी ९ ते १२ चे वर्ग सुरू केले होते. कोरोनामुळे बिकट परिस्थीती निर्माण झाली आहे, मात्र भविष्यात त्यांना संकटाना सामोरे जायला लागू नये यासाठी शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेण्याचा प्रयत्न आहे. शाळा वाडयावस्त्यांमध्ये गावांमध्ये पोहचल्या आहेत. व्हिजन २०२५ च्या माध्यमातून भविष्यात शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी काम करावयाचे आहे. आदर्श शाळा निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, लागाणारा अभ्यासक्रम, मुल्यांकण या गोटी कराव्या लागतील. तसेच मुलांना काय शिकवले पाहीजे यासाठीचे प्रेझेंटेशन मुखयमंत्र्याना दाखविण्यात आले आहे.
