जनतेज न्युज

सेवामुक्तीचे आदेश, आशा वर्कर्सचा मुश्रीफाना घेराव, सीइओवर प्रश्नांचा भडिमार

प्रतिनिधी , कोलापूर : वाढीव मानधन व थकीत मानधन मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या २००० आशा वर्कर्सना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कार्यामुक्तीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आशा वर्कर्स यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनाच घेराव घातला. सीईओ यांनीं केलेला प्रकार चुकीचा असून त्यांचे कार्यमुक्तीचे आदेश मागे घेण्याच्या सूचना केल्या. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच अमन मित्तल यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्व्हेचे मानधन न मिळाल्यामुळे आशा वर्कर्स आक्रमक झाल्या आहेत. कोरोना काळात काम केलं मात्र मानधन देण्यास कोल्हापूर जिल्हा परिषदेची टाळाटाळ होत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे तीन हजार आशा वर्कर्सनी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.
संकटाच्या काळामध्ये जिवाची पर्वा न करता दारोदारी जाऊन सर्व्हेचे काम केले.मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला कार्यमुक्तीचे आदेश दिले. हे कितपत योग्य आहे. अशी भूमिका घेत थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं आशा वर्कर्स युनियन च्या महिला पदाधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यावेळी कार्यमुक्तीचे आदेश दुलेल्या संतप्त झालेल्या महिला वर्कर्सनी मुश्रीफ यांच्या समोरच सीईओ यांची कानउघाडणी केली. त्यावर मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत, कार्यामुक्तीचे आदेश परत घेण्याचा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना दिल्या. तसेच राज्याचे मुख्य आरोग्य सचिव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून राज्यातील आशा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, व वाढीव मानधन त्वरित द्या, अशा सूचना दिल्या.