प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात उतरून संभाजी ब्रिगेडने अनोख आंदोलन केलं आहे.
सोलापूरला स्मार्ट सिटीची मान्यता मिळाली आहे मात्र विकासाच्या नावाखाली सोलापूर महापालिकेने संपूर्ण शहरात खड्डेच खड्डे केले आहेत,
यामुळे सोलापुरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड ने केला आहे.
यावेळी सोलापूर महापालिकेच्या कार्व्हरविरोधात संभाजी ब्रिगेड ने जोरदार घोषणाबाजी केली.
