प्रतिनिधी , सोलापूर- सोलापुरात जातपंचायतीचा अन्यायकारक कारभार समोर आला आहे. शरणीदास भोसले नामक व्यक्तीच्या कौटुंबिक वादात हस्तक्षेप करून शरणीदास यांना जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार घडला आहे. शरणीदास हे हिंदू गोंधळी समाजाचे असून त्यांच्या बायकोपासून वेगळे राहत आहेत.
शाराणीदास भोसले हे मूळचे सोलापूरचेच. वडिलांसोबत लहानपणी ते सांगलीला गेले. 2008 मध्ये शाराणीदास यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी,दोन मूले झाली. काही वर्षानंतर पती-पत्नीत वाद सुरु झाला. पत्नीने सोलापूर रविवार पेठ येथील गोंधळी समाज जातपंचायतीमध्ये न्याय मागितला. 2018 मध्ये जात पंचायतीने पत्नीपासून लांब राहण्याचा निर्णय दिला. हा निर्णय शारनिदासने मान्य न केल्याने त्यांना 2018 पासून जातीतून बहिष्कृत करण्यात आले आहे. मात्र, कौटुंबिक अश्यातच भांडण मिटवण्यासाठी तसेच परत समाजात घेण्यासाठी पंचांनी 2 लाख रुपये मगितल्याचा आरोप देखील भोसले यांनी केला आहे.
शरणीदास यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये आजारी असताना त्यांच्या भावाने भीतीपोटी भेटुसुद्धा दिले नाही. तसेच, शरणीदास यांच्या मुलीनेसुद्धा जातपंचायतीविरुद्ध आवाज उठवलाय. जातपंचयत कायमची बरखास्त करण्यात यावी अशी मागणीसुद्धा या बापलेकींनी शासनाकडे केली आहे. तसेच शरणीदास यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणात एमआयएमडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना अटक देखील केली आहे.
