प्रतिनिधी , सोलापूर: सोलापूर महापालिकेकडून हलगी लावून आज थकीत मिळकत कराची वसुली करण्यात येत आहे.
यामध्ये महापालिकेचा साडे अठरा लाख रुपयांचा कर नभरल्याने सात रस्ता परिसरातील ‘तळवळकर जिम’ ला सील ठोकण्यात आले आहे.
दरम्यान माजी आमदार रवी पाटील यांची आर वन इमारत ही साडे तेरा लाखांचा कर नादेऊ शकल्याने ती इमारत ही सील करण्यात आली आहे.
युको बँकेची साडे तेरा लाखांची थकबाकी शिल्लक असल्याने या बँकेच्या इमारतीला ही सील करण्यात आले आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या छात्रछायेखालील संस्थेकडे ही महापालिकेची थकबाकी बाकी असल्याने त्यांची संस्था ही सील करण्यात आली आहे.
अशी माहिती महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
