प्रतिनिधी , कोल्हापूर: येथे पंचगंगा आणि कृष्णाचा मोठा महापूर आला आहे. कोकणात देखील पावसाने थैमान घातले. अशातच लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अशा संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना 1000 चादरीची मदत सोलापूर हून पाठवीत आहोत.
शनिवारी सायंकाळी 1000 सोलापूरी चादरी घेऊन सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहन रवाना झाले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून ही मदत पोहोचती करण्यात येत आहे. तसेच येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यानिमित्ताने दिलीप धोत्रे बोलताना म्हणाले , महापुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक कंबरडे देखील मोडले आहे. अशातच माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने एक माणुसकीचा हात म्हणून आपण मदत पाठवत आहोत. तसेच आजपासून वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या माध्यमातून देखील मदत पाठवण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे.
