जनतेज न्युज

सोलापूर-हायवेवरती वाहने अडवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सोलापूर पोलिसांनी केलं जेरबंद

प्रतिनिधी , सोलापूर : रोडवरती वाहन अडवून जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
त्यांच्याकडून एकूण 9 लाख 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
29 जून 2020 रोजी प्रशांत विजयकुमार लांडगे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी हे आपल्या स्विफ्ट कारणे टेंभुर्णी ते कुर्डुवाडी रोडवर प्रवास करत असताना माढा तालुक्याच्या हद्दीत अंबड जवळ कारला मोटारसायकल आडवी लावून तीन आरोपींनी कारचा ताबा घेऊन फिर्यादी जवळचे 4 हजार 500 रुपये घेऊन फिर्यादीस निर्जन स्थळी सोडून कारची चोरी केली होती.
या प्रकरणी बतमीदारामार्फत माहिती मिळल्यानुसार पोलिसांनी स्विफ्ट कारची तपासणी केली असता त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे न मिळाल्याने संशय वाढून वाहनाची तपासणी केली असता संबंधित वाहन चोरीचे असल्याचे गुन्ह्याची उकल झाली आसल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.