जनतेज न्युज

स्वच्छतादूत गवळणबाई यांचे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात १५ हजारांचे दान

प्रतिनिधी , पुणे : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू आहेत. यात अनेक संस्था-व्यक्ती मदत करत आहेत. अगदी मर्यादित उत्पन्न असणारेही जे लोक सामाजिक भान ठेवून यात हातभार लावतात त्यांच्या मनाच्या मोठेपणाची दखल घेतलीच पाहिजे. अशीच एक व्यक्ती आहे पुण्याच्या विश्रांतवाडीतील गवळणबाई मुरलीधर उजागरे. गवळणबाई स्वच्छतादूत आहेत. त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात १५ हजार रुपये दान दिले आहेत.

गवळणबाई विश्रांतवाडीतील भीमनगर झोपडपट्टीत राहतात. त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. २० वर्षांपासून धानोरीतील भैरवनगर परिसरातील घरांमधला कचरा गोळा करतात. प्रत्येक घरातून दरमहा त्यांना ६० ते ७० रुपये मिळतात. काही घरे पैसे देत नाहीत. अडचणीसाठी, औषधोपचार करण्यासाठी वाचवून ठेवलेले १५ हजार रुपये त्यांनी कोरोना प्रतिबंधक कामांसाठी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.