आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुट्टीदिवशी कर्मचारी आले स्वच्छतेला; प्रत्येक महिन्याचा एक दिवस करणार कार्यालयीन कर्मचारी स्वच्छता: उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत सांगली मिरज कार्यालायची झाली स्वच्छता
प्रतिनिधी , सांगली : सांगली स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपले योगदान म्हणून एक दिवस स्वच्छतेसाठी उपक्रम दिला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सुट्टीदिवशी कर्मचारी स्वच्छतेसाठी आपल्या कार्यालयात येऊन त्यांची स्वच्छता केली आहे. याच प्रकारे प्रत्येक महिन्याचा एक दिवस मनपा कार्यालयीन कर्मचारी स्वच्छता करणार आहेत. आज उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत सांगली मिरज कार्यालयाची स्वच्छता करीत कचरा आणि थुंकलेले परिसर स्वच्छ करण्यात आले. मनपा कार्यालयातील या स्वच्छता मोहिमेत अंदाजे 1 टन कचरा गोळा झाला आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या कार्यालयात अस्वच्छता असल्याचे आणि अनेक भिंतीवर मावा गुटखा खाऊन थुंकून भिंती अस्वच्छ झाल्याची बाब निदर्शनास आलेनंतर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार शनिवारी कर्मचाऱ्यांनी एकदिवस स्वच्छतेसाठी अभियान राबवित आप आपली कार्यालये स्वच्छ केली. यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मनपाच्या सांगली मिरज आणि कुपवाड कार्यालयात सर्व कार्यालयीन कर्मचारी सुट्टीदिवशी फक्त स्वच्छतेसाठी एकत्र आले होते. यावेळी विविध कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली कार्यालये स्वच्छ करत आतील कचरा संकलन केला. यावेळी कार्यालयांची आवारे सुद्धा स्वच्छ करण्यात आली. सांगलीत उपायुक्त राहुल रोकडे यांनी स्वच्छता मोहिमेची पाहणी केली तर मिरजेत उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्वच्छता अभियानाचे नियोजन केले. या स्वच्छता मोहिमेमुळे मनपा कार्यालये स्वच्छ झाली असून परिसराची सुद्धा स्वच्छता केली. या मोहिमेत अंदाजे 1 टन कचरा संकलित झाला आहे. या अभियानाचे आणि एक दिवस स्वच्छतेसाठीया कर्मचाऱ्यांच्या उपक्रमाचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी अभिनंदन करीत कौतुक केले. सांगलीच्या स्वच्छतेमध्ये प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, कामगार अधिकारी अनिल चव्हाण, नगरसचिव चंद्रकांत आडके, वीज अभियंता अमर चव्हाण, स्वच्छ सर्व्हेक्षणच्या समन्वयक वर्षांराणी चव्हाण, प्रमोद रजपूत , इरफान चौगुले आदींनी सहभाग घेतला तर मिरजेत उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कुपवाड कार्यालयातही एक दिवस स्वच्छतेसाठी या उपक्रमात अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेत आपले योगदान दिले.
आजच्या मोहिमेप्रमाणे प्रत्येक महिन्याचा 1 दिवस कार्यालयीन कर्मचारी स्वच्छतेसाठी देणार आहेत.
