प्रतिनिधी , दिल्ली : दिल्ली येथे गेल्या 28 दिवसांपासून चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आज कार्यकर्त्यांसह दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर पोहचले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी तुपकरांचे जोरदार स्वागत केलेय. यावेळी रविकांत तुपकरांनी आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित केले..हे आंदोलन फक्त पंजाब – हरियाणातील शेतकऱ्यांचे नसून महाराष्ट्रातील शेतकरी ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कराल तर केंद्र सरकारला महागात पडेल..सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये..दिल्लीतील आंदोलनावर जर लवकरात-लवकर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जथ्थेच्या – जथ्थे दिल्लीत दाखल होतील, असा इशारा यावेळी रविकांत तुपकरांनी दिला..
