प्रतिनिधी , बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलडाणा- अजिंठा महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. तब्बल 2 तास चालेल्या या रास्तारोको मुळे बुलडाणा- अजिंठा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या..
या रास्तारोकोमध्ये शेतकरी विरोधी कृषी विधेयके सरकारने रद्द करावे.. शेतकऱ्यांना किमान हे.25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी..पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना 100% पिकविमा देण्यास सरकारने बाध्य करावे.. कापसाची हमीभावांने खरेदी करण्यासाठी तात्काळ CCI चे खरेदी केंद्र चालू करावे..या मागण्या करण्यात आल्याय.यावेळी रविकांत तुपकरांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन्ही गंभीर नसून जर सदर मागण्यां मान्य झाल्या नाही तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्र व राज्य सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे.या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता..
