जनतेज न्युज

हाथरस येथील झालेल्या घटनेबाबत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्याकरता गेलेल्या राहुल गांधी,प्रियांका गांधी यांना पोलिसान कडून धक्काबुकी

हाथरस येथील झालेल्या घटनेबाबत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्याकरता गेलेल्या राहुल गांधी,प्रियांका गांधी यांना पोलिसांनी कडून धक्काबुकी केली.त्याचा निषेध म्हणुन देशभरात काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असुन राज्यातही ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे.
पुण्यातही पुणे शहर काँग्रेसच्यावतीने स्टेशन परिसरातील बाबासाहेब आंबेडकर याच्या पतळयासमोर हे सत्याग्रही आंदोलन करण्यात आले. हाथरस मधील घटनेत दलित समाजाच्या मुलीवर अमानुष हत्या आणि बलात्कार करण्यात आला. यात तिचा मृत्यु झाला. या घटनेनतंर देशभरात रोष व्यक्त होत असुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी,प्रियांका गांधी मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यास गेले होते. पण त्यांना अडविण्यात आले याशिवाय त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचे सर्व स्तरातुन निषेध केला जात आहे.