प्रतिनिधी , हिंगोली : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांच्या विरोधात निषेध म्हणून शिवसेनेने हिंगोली शहरात भव्य बैलगाडी मोर्चा काढला. शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयापासून निघालेला हा मोर्चा इंदिरा गांधी चौक,महात्मा गांधी चौकमार्गे बस स्टॅन्ड येथे विसर्जित झाला. या मोर्चात 50 हून अधिक बैल गाड्यांनी सहभाग नोंदविला होता.यामध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. केंद्र सरकार म्हणते की हे राम राज्य आहे. राम राज्यांमध्ये 94 रुपयाच्या वर पेट्रोलचे दर आहेत. हेच का ते राम राज्य ?केंद्र सरकारने पेट्रोलचे दर कमी नाही केले तर शिवसेना यापुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे.
