जनतेज न्युज

हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या वतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शने

प्रतिनिधी , हिंगोली : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात हरियाणा व पंजाबातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी दिल्लीत एकत्र आले आहेत. ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर आंदोलकांनी दिल्ली शहरामध्ये आली आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधातील हे कायदे मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. परंतु हे आंदोलन देश विरोधी ठरवत केंद्र सरकार हे आंदोलन मोडून काढण्याच्या प्रयत्न करत आहे. यात आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या विविध संघटना पक्ष एकत्र आल्या आहेत. आज या विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने हिंगोलीत केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत.