प्रतिनिधी , मुंबई : राममंदिर(Ram Mandir) भूमिपूजन सोहळ्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. तसेच आजचा दिवस हा तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्री राम यांच्या मंदिराचे आज भूमिपूजन झाले. आपल्या सर्वांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख(Shiv Sena) वंदनीय बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagwat), गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश होता.
दरम्यान, भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील अयोध्येत जाणार आमि तेथे शिवसेना थाटामाटात कार्यक्रम करणार असे संजय राऊत यांनी जाहीर केेेले आहे.
