जनतेज न्युज

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

प्रतिनिधी , पुणे : रामटेकडीजवळ स्वामी विवेकानंद नगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रवींद्र एल. पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे दिनेश प्रसाद होले, पत्रकार महेश जांभूळकर , विजय भोसले, दिलीप भिकुले व रमेश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रल्हाद सोनवणे , उत्तम आढाव , महेश जांभुळकर , ज्योती पटाईत, विपुल बहुले ,स्टिव्हन येसुदास, हेमंत माहेश्वरी, आशिष बोद्दूल, सचिन सूर्यवंशी, अक्षय मोरे, सोनवणे ,डॉ विराज सोनवणे ,सुरेखा कोनेसागर, सुहास पवार ,शिवम जाधव आदींना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मोहन विश्वनाथ नारायणे व प्रफुल्ल प्रल्हाद सोनवणे यांना देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अभिषेक सोनवणे, शिवपुत्र जोगदनकर, हर्षद पुरिया, सुहास पवार, रवींद्र जावळे,नंदू नवले, बर्णाट अँथोनी, संदीप देसाई ,लालन सोनवणे ,भारती सोनवणे, मधुकर सूर्यवंशी ,लालचंद अहिर ,फेलेक्स आर्यन, सूर्यकांत गायकवाड व संतोष टोणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.