प्रतिनिधी , मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाचं आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केल आहे. या वृत्ताला खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला आहे. मुंब्रा येथील एक वरिष्ठ पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या संपर्कात आलेले असल्यानं त्यांनीही होम क्वारंटाइनचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून भावनिक पोस्ट टाकली आहे.
त्यात त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. हो,काल माझी देखील कोव्हीड 19 ची टेस्ट करण्यात आली. माझ्या सोबत काम करणाऱ्या एका पोलीस सहकाऱ्याला कोरोना ची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.यात माझा देखील समावेश होता. माध्यमात या बातम्या आल्या आणि अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत.आपण माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास नेहमीच दाखवता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सुदैवाने माझ्या टेस्ट चे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.तरीही प्रोटोकॉल नुसार मला आता किमान 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.जी की अत्यावश्यक बाब आहे.
दुःख एका गोष्टीच वाटत की,लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कळवा मुंब्रा भागात मी अन्नाची पाकीट गरजूंना वाटत होतो. त्या मी रोज स्वतःच्या निरीक्षणाखाली बनवून घेत होतो. आता पुढील 14 दिवस ते शक्य नाही. तरी माझे सहकारी हे काम थांबवणार नाहीत, याची मी हमी देतो. कळवा, मुंब्रा, सोलापूर आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की,कृपा करून घरी बसा.आणि आपली तशीच आपल्या परिवाराची काळजी घ्या. येत्या 7 दिवसात पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येईल. आणि मला विश्वास आहे की, या टेस्टचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह येऊन,लवकरात लवकर तुमच्यामध्ये “मी पुन्हा येईन..!
