प्रतिनिधी , बुलडाणा : कॉलेजमध्ये गेलेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी शेगाव पोलिसात केली असून या प्रकरणी युवकांविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश गावंडे असे यातील आरोपीचे नाव असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील संगम नगर भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून शेजारीच राहणाऱ्या नागेश गावंडे नामक युवकाने युवती कॉलेज मध्ये जात असतानाच अपहरण केल्याची तक्रार युवतीच्या वडिलांनी केली असून या प्रकरणी शेगाव शहर पोलिसात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला ८ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही मुलगी परत मिळाली नसल्याने युवतीचे आईवडील दररोज पोलीस स्टेशनला चकरा मारतांना दिसत आहे. दुसरीकडे पोलीस कसून तपास करीत असल्याचे समजते.
