जनतेज न्युज

३१ डिसेंबर रोजी वायफळ पैसे खर्च न करता व पार्ट्या न करता गोरगरिबांना मदत करा युवा फाउंडेशन सांगलीचा उपक्रम

प्रतिनिधी , पुणे- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जगात वेगवेगळ्या प्रकारे जल्लोष साजरा केला जातो पण सांगलीतील सावली बेघर संस्था याठिकाणी 31 डिसेंबरसाठी वायफळ पैसा खर्च न करता त्या पैशांमध्ये बेघर व गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. यावेळी युवा फाउंडेशन व देवा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे युवा पिढी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.