जनतेज न्युज

३५०० रूपयांची लाच घेतांना महिला वेतन अधिक्षक जाळ्यात

प्रतिनिधी, भंडारा : अर्जित रजेचे देयके मंजुर करण्याकरीता ३ हजार ५०० रूपयांची लाच मागणा-या भंडारा येथील वेतन भविष्य वेतन निर्वाह निधी पथक, माध्यमिक, जिल्हा परिषद भंडारा चे अधीक्षकास भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात अटक केली. श्रीमती प्रतिभा लक्ष्मण मेश्राम वय ४८ वर्ष पद अधीक्षक, वेतन भविष्य वेतन निर्वाह निधी पथक, माध्यमिक, जिल्हा परिषद विभाग भंडारा असे लाचखोर अधिका-याचे नाव आहे.तक्रारदार पुरुष ५८ वर्षे हे कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले असून  त्याचे अर्जित रजा रोखीकरणाचे मोबदला रक्कम मिळणेकरिता अधीक्षक, वेतन पथक, शिक्षण विभाग माध्यमिक, भंडारा यांच्या कार्यालयात देयक मंजुरी करीता सादर केले होते. त्यावर आरोपी श्रीमती प्रतिभा मेश्राम यांनी सदर देयके मंजुर करून देयकाची रक्कम अदा करण्यासाठी कोषागार कार्यालयात  पाठविण्याच्या मोबदल्यात ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची