जनतेज न्युज

डोंबिवलीत काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेला सुरुवात

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ” भारत जोडो अभियान” अंतर्गत संपूर्ण देशात 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान संपूर्ण देशात “आजादी गौरव पदयात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे .या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .ही यात्रेची सुरवात डोंबिवली पश्चिम येथून आझादी गौरव  सुरुवात झाली ही यात्रा संपूर्ण कल्याण डोंबिवली ते मोहने टिटवाळा 82 किलोमीटर असणार आहे.12 ऑगस्ट ला  कल्याण ,पूर्व,13 ऑगस्टला कल्याण पश्चिम आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी मोहने टिटवाळा या ठिकाणी सांगता होणार आहे. विशेष म्हणजेया पदयात्रेत 75 वर्षात काँग्रेसच्या माध्यमातून देशाने केलेली प्रगती व  8 वर्षात भाजपने केलेल्या चुकीच्या निर्णयाबाबत जनजागृती केली जाणार आहे