प्रतिनिधी , मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाळयात धबधबे,झरे,धरणे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ वाढते,निसर्गाचे दर्शन आणि मौज मजा करण्यासाठी अनेक जण अशा ठिकाणी आपल्या कुटुंबासह येत असतात. भर पावसात भिजल्यावर थंडीची हुडहुडी भरते त्यामुळे शरीराला गरमी मिळावी म्हणून काही गरम खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतात. या दिवसात मक्याला मोठ्या प्रमाणात पसंती असल्याचे दिसते. मक्याने भूक ही भागते तर शरीराला गरमी ही मिळते,त्यामुळे मके खाण्यासाठी मोठी गर्दी दिसते .मात्र पोलिसांनी काही निर्बंध लादले असल्याने त्यावर थोडी मंदी आहे.
